Ladki Bahin Yojana New Update Today: या महिलांचे अर्ज बाद, सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा

2 Min Read
Ladki Bahin Yojana New Update Today

Ladki Bahin Yojana New Update Today: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Sudhir Mungantiwar announces changes to Ladki Bahin Yojana eligibility. Women with annual incomes above ₹2.5 lakh or tax-paying applicants won’t receive benefits under this scheme).

Sudhir Mungantiwar: महाराष्ट्र सरकारने सुरु केलेला माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्या महिला किंवा महिलेच्या कुटुंबातील सदस्य कर भरतात, त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.  

महत्त्वाचे मुद्दे:  

  1. वाढीव रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा: 

   पात्र लाभार्थींना वाढीव रकमेचा ₹2100 चा हप्ता मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.  

  1. अनेक महिलांचे अर्ज बाद:  

   वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा अधिक असलेल्या किंवा कर भरणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जातील.  

  1. महायुतीची भूमिका:  

   माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहील, मात्र फक्त पात्र लाभार्थींनाच लाभ दिला जाईल.  

  1. पात्र महिलांनीच करावा अर्ज:

   महिलांनी अर्ज करताना आपले उत्पन्न निकष व इतर पात्रतेची खात्री करावी आणी जर आपण पात्र असाल तरच अर्ज करावा. यापूर्वी पात्र ठरलेल्या महिलांची पडताळणी करूनच लाभ दिला जाणार.

विधानसभा निवडणुकीत ही योजना प्रचाराचा केंद्रबिंदू होती. महायुतीच्या महिलांना दरमहा ₹2100 देण्याचे वचन दिले होते. आता त्याची अंमलबजावणी आणि निकष कसे राहतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.  

ताज्या अपडेट्ससाठी ‘मराठी सरकारी योजना’ वेबसाइटला भेट द्या!

🔴 हेही वाचा 👉 आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये पुढच्या रक्षाबंधनला.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now