महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारची नवीन योजना Bima Sakhi Yojana

2 Min Read
LIC Bima Sakhi Yojana Details In Marathi

LIC Bima Sakhi Yojana Details In Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव LIC बीमा सखी योजना आहे. भारतीय जीवन बीमा निगमच्या (LIC) माध्यमातून राबवली जाणारी ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरु करण्यात आली आहे. यामुळे महिलांना नोकरीसह उद्योजकतेची संधी मिळणार आहे. (PM Modi launches LIC Bima Sakhi Yojana to empower women through training and job opportunities. Learn about the benefits, stipend, and how it promotes women’s economic independence).

LIC बीमा सखी योजना काय आहे?  

LIC बीमा सखी योजना ही भारतीय जीवन बीमा निगमची एक महत्वाकांक्षी योजना आहे, ज्याअंतर्गत 18 ते 70 वर्षे वयोगटातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेद्वारे महिलांना LIC एजंट बनण्याची आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांना LIC डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी मिळणार आहे.  

प्रशिक्षणादरम्यान मिळणार वेतन आणि सुविधा  

  1. पहिल्या वर्षी महिलांना 7000 रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळेल.  
  2. दुसऱ्या वर्षी 6000 रुपये प्रति महिना, तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये प्रति महिना स्टायपेंड दिले जाईल.  
  3. प्रशिक्षणानंतर LIC एजंट बनलेल्या महिलांना कमीशनच्या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळेल.  

रोजगार निर्मितीचा मोठा उद्देश  

LIC बीमा सखी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना रोजगार दिला जाणार आहे, तर पुढील टप्प्यात 50,000 महिलांना रोजगार देण्याचा सरकारचा मानस आहे.  

योजनेचा उद्देश

महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना आर्थिक स्थैर्य देणे आणि त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.  

कोण करू शकतात अर्ज?

  • किमान 10वी पास महिला अर्ज करू शकतात.  
  • पदवीधर महिलांना थेट डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी.  
  • अर्ज करण्यासाठी महिलांनी LIC च्या अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या LIC कार्यालयात संपर्क साधावा. 

जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर जवळच्या LIC कार्यालयात संपर्क साधा.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now