Latest News On Maharashtra CM: महाराष्ट्राच्या कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. पण, त्यानंतरही राज्याचे पुढील मुख्यमंत्री कोण असतील, याबद्दल अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. याच दरम्यान, महाराष्ट्राच्या सीएम पदासाठी एका नवीन चेहऱ्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. (Maharashtra’s CM race heats up with new speculations. Shinde and Fadnavis’ names are now being questioned as Murlidhar Mohol emerges as a potential candidate).
नवीन चेहरा: मुरलीधर मोहोळ
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शर्यतीत आता एक नवीन नाव समोर आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव अचानक चर्चेचा विषय बनल आहे. सोशल मीडियावर त्यांच्या सीएम पदासाठीच्या चर्चाना उधाण आल्याने अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर भाजपच्या गटात चर्चा सुरू आहे आणि अनेकजण त्यांना महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत.
महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळाल, पण…
महाराष्ट्रात महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले असून भारतीय जनता पार्टी (BJP) सर्वात मोठी पार्टी ठरली आहे. परंतु, निवडणूक निकाल जाहीर होऊन एक आठवडा होऊन गेला तरीही राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळालेला नाही. यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, यावर अजूनही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. भाजपने मौन पाळल्याने मुख्यमंत्री पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चर्चा आणि अफवांनंतर मुरलीधर मोहोल यांनी स्वतःच उत्तर दिलं आहे. ट्विटरवर त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी माझं नाव घेऊन चर्चा करण फालतू आणि कल्पित आहे. आम्ही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या निवडणुकीत लढलो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे संसदीय बोर्ड ठरवेल.
मुख्यमंत्री पदाच्या निवडीवर अजूनही चर्चा सुरू
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाच्या निवडीवर अजूनही चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आधीच चर्चा होत होती, पण आता मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने वातावरण तापले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर यंदाच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीचा मोठा परिणाम होईल, आणि त्यासाठी आणखी काही बैठकांची तयारी सुरू आहे.