Maharashtra Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळवून दिला. मात्र, सरकार स्थापन होताच योजनेच्या अटी व शर्तींमध्ये बदल होण्याच्या चर्चेमुळे महिलांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः लाभार्थी महिलांवर कठोर निकष लावण्याचा विचार सुरू असल्याने काहींची नावे वगळली जाऊ शकतात. (Majhi Ladki Bahin Yojana Updates: Maharashtra Government may revise eligibility criteria to ensure benefits reach the deserving. Learn about the new rules, scrutiny process, and the impact on women beneficiaries).
नवीन अटी
- आर्थिक निकष: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणार नाही.
- वाहनधारक: कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास अर्ज अपात्र.
- अर्जदार मर्यादा: एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोनच महिलांना लाभ मिळणार.
- इतर योजना लाभ: इतर सरकारी योजनांमधून 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळत असल्यास अर्ज अपात्र.
- शेतजमीन: कुटुंबाची 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन असल्यास अर्ज अपात्र ठरणार.
महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा
महिला लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. निवडणुकीपूर्वी या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान एकूण 7,500 रुपये जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार, लाडकी बहीण योजनेची रक्कम ₹1,500 वरून ₹2,100 करण्यात येईल, परंतु डिसेंबर हप्ता मात्र जुन्या निकषांनुसारच 1500 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे.
महिलांमध्ये अस्वस्थता
ग्रामीण भागात महिलांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या बदलांमुळे तालुक्यातील अनेक महिलांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, आणी त्यानंतर दरमहा 2100 रुपयांसाठी पात्र असणाऱ्या महिलांची अंतिम लाभार्थी यादी प्रसिद्ध केली जाईल. योजना पारदर्शक करण्याचा सरकारचा उद्देश असला तरी या कठोर तपासणी प्रक्रियेने महिलांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
“ताज्या अपडेटसाठी marathisarkariyojana.in ला भेट द्या किंवा गूगलवर व्हॉइस सर्च करा – ‘मराठी सरकारी योजना‘.”