लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिने मिळणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले Majhi Ladki Bahin Yojana Update News

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Update CM Eknath Shinde discusses

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News Today : बुलढाणा येथे झालेल्या (Mazi Ladki Bahin Yojana) माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना (Cm Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिने मिळणार आहेत? माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण किती हफ्ते मिळणार आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले… (Discover the latest update on Majhi Ladki Bahin Yojana. CM Eknath Shinde discusses the duration and number of installments under this scheme, ensuring financial support for women in Maharashtra).

Maharashtra News Today Marathi : महाराष्ट्र सरकारने नव्यानेच सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात सुमारे 1 कोटी 59 लाख महिलांना 4787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. जुलै आणी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले असून काही महिलांनी जुलै-ऑगस्ट मध्ये अर्ज केला असूनही अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आता माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे (3rd installment of ladki bahin yojana) जमा होताच त्यांच्याही खात्यात तीन महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

19 सप्टेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार होती परंतु अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तरी ते लवकरच होतील अशी माहिती मिळाली आहे. अशातच माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिने मिळणार? लाडकी बहीण योजनेचे एकूण किती हफ्ते मिळणार आहेत? असे प्रश्न लाडक्या बहिणींकडून वारंवार विचारले जात आहेत. (Cm Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच प्रश्नाचे उत्तरं दिले आहे. जाणून घ्या ते काय म्हणाले…

माझी लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलढाणा येथे झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी माझी लाडकी बहीण योजना व्यापकपणे व गतीने राबविण्यात आली. आत्तापर्यंतची सर्वात कमी वेळेत खात्यात पैसे जमा करणारी ही योजना ठरली आहे. शासनाने 33 हजार कोटी रुपये या योजनेसाठी काढून ठेवले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही. योजनेत मिळणाऱ्या रकमेमुळे राज्यातील भगिनींना निश्चित मदत होत आहे. यापुढेही आम्ही ही रक्कम वाढवत जाऊ. असं मुख्यमंत्री म्हणाले.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article