Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment Maharashtra Government Update: महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आणि त्यांना सशक्त बनवण्यासाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे ‘माझी लाडकी बहिन योजना’. या योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रितपणे देण्यात आला होता. आता पात्र असणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.(Latest update on Majhi Ladki Bahin Yojana: Maharashtra’s new government to release the 6th installment soon. Eligibility checks to ensure benefits for genuine beneficiaries).
नवीन सरकार आणि सहावा हप्ता
महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या पुढील टप्प्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत, पात्र लाभार्थीची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच डिसेंबर अखेर पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या हफ्याचे पैसे जमा केले जाऊ शकतात. पण जर पडताळणी प्रक्रियेस विलंब झाला तर 6वा हफ्ता संक्रांतीपर्यंत जमा केला जाईल अशी माहिती समोर आली आहे.
कुणाला मिळणार सहावा हप्ता?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या पात्रतेविषयी महत्त्वाचे विधान केले आहे. योजनेच्या लाभार्थींची पात्रता तपासली जाईल. आणी पात्र नसलेल्या महिलांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळाले जाईल.
पात्रतेचे निकष:
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
- महिलेचे बँक खाते आधारशी लिंक असावे.
- अर्जासोबत आधार कार्ड, पत्ता पुरावा, आणि बँक स्टेटमेंट जमा करणे आवश्यक आहे.
पात्र महिलांसाठी पुढील प्रक्रिया
महिलांना सहाव्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी सर्व पात्रता अटींची पूर्तता करावी लागेल. ज्या महिलांचे खाते आधारशी लिंक नाही किंवा अन्य कारणांमुळे नियमात बसत नाहीत, त्यांना 6वा हप्ता मिळणार नाही.
‘माझी लाडकी बहिन योजना’ – महिलांसाठी महत्त्वाचा आधार
लाडकी बहिन योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सशक्त बनवण्याचा सरकारचा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनासाठी या योजनेतून महिलांना आर्थिक मदत दिली जाते.