Majhi Ladki Bahin Yojana New Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता लवकरच जमा होणार आहे. अशातच लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार काही महिलांना पुढचा हफ्ता मिळणार नाही. (Majhi Ladki Bahin Yojana Update: Find out why some women might not receive the 6th installment of ₹2,100 under the scheme. Learn about the revised eligibility criteria, re-verification process, and the latest announcements from the Maharashtra government).
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Next Installment: सरकारकडून 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा करण्यात आले होते. ऐन निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या देण्यात येत असलेली दरमहा 1500 रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होत. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा महायुतीच सरकार स्थापन होणार हे समजताच लाडक्या बहिणींना 6वा हफ्ता कधी व किती रुपये मिळणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
महिला व बालकल्याण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माझी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची पुनः पडताळणी होणार असून त्यातील जे खरे लाभार्थी आहेत फक्त त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सध्या अनेक महिला स्वतःचा व्यवसाय करत आहेत तरीही त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे तसंच अनेक महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहेत तर काहींची 8-10 एकर बागायत शेती असून अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याच समोर आल्यान सर्व लाभार्थ्यांचं पुनः सत्यापन करण्यात येणार असल्याच अधिकाऱ्यांनी सांगितल. ही प्रक्रिया नेमकी कशी असेल आणी कधीपासून सुरु होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.
पात्रता निकषानुसार या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल
- सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत
- बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी असेल
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल
- ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असेल
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असेल
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किवा राज्य सरकारच्या मंडळाचा सदस्य असेल