Majhi Ladki Bahin Yojana Guidelines Change Sanjay Raut Statement: शिवसेनेचे खासदार (यूबीटी) संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “महिलांना कोणतीही शहानिशा न करता 1500 रुपये देण्यात आले आणि आता सरकार निकष बदलण्याच्या तयारीत आहे,” असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut criticizes the government for Majhi Ladki Bahin Yojana guidelines change, urging not to recover money from women beneficiaries. Government plans to increase aid to ₹2100 per month).
संजय राऊत म्हणाले, “लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी होती, मात्र निवडणुकीच्या आधी कोणतेही निकष न लावता लाभार्थ्यांना पैसे वाटण्यात आले. एका घरातील तीन तीन महिलांना पैसे दिले गेले, हे चुकीचे आहे. आता सरकारला (Majhi Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेचा तिजोरीवर भार जाणवत आहे, त्यामुळे निकष बदलण्याचा विचार सुरू आहे. मात्र, या महिलांना पैसे परत मागणे हा अन्याय असेल.”
महिलांना दिलेले पैसे परत न घेण्याची मागणी
संजय राऊत यांनी सरकारला स्पष्टपणे सुचवले की, “महिलांना नोटिसा पाठवून पैसे मागवण्याचा प्रकार टाळावा. जे पैसे वाटले गेले आहेत, त्यावर काहीही आक्षेप घेऊ नये.”
🔴 हेही वाचा 👉 मोठी बातमी! अर्जांच्या छाननीत ५० लाख लाभार्थी अपात्र होण्याची शक्यता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 2100 रुपयांची घोषणा
महायुती सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात (Majhi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींची तरतूद केली आहे. योजनेतील 2.34 कोटी पात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे 7,500 रुपये थेट बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. तसेच, लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये मासिक आर्थिक मदत देण्याऐवजी आता ती रक्कम 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे.
🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, लाडक्या बहिणींना दिलासा.
लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार?
महायुती सरकारने महिला लाभार्थ्यांच्या अर्जांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेच्या निकषांमध्ये अपात्र ठरवले जाऊ शकते. मात्र, यामुळे लाभार्थी महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
🔴 हेही वाचा 👉 तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची प्राथमिक तपासणी सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण.
राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु
माझी लाडकी बहीण योजनेवरून (Majhi Ladki Bahin Yojana) सध्या राजकीय वातावरण तापलेले असून महायुती सरकारच्या भूमिकेवर शिवसेनेने (यूबीटी) गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता निकषांमध्ये बदल होणार की सरकार महिलांच्या हितासाठी नवी धोरणे आखणार, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.