Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सध्या दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांचे हप्ते अडव्हान्स स्वरूपात दिले गेले होते. मात्र, सध्या राज्यातील करोडो महिला डिसेंबर 2024 च्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.
महायुती सरकारने निवडणूकपूर्वी लाडकी बहीण योजनेचा मासिक हफ्ता ₹2100 पर्यंत वाढविण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, आर्थिक संसाधनांचा अभ्यास करूनच हफ्ता वाढवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता ₹1500 चाच असण्याची शक्यता आहे.
महिलांसाठी हेल्पलाइन नंबर:
जर तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला नाही, तर महिलांनी हेल्पलाइन नंबर 181 वर कॉल किंवा 9861717171 वर व्हाट्सअँप करून तक्रार नोंदवावी. हेल्पलाइनद्वारे तुमच्या समस्येचे निराकरण करण्यात येईल.
संक्रांतीपूर्वी हप्ता जमा होण्याची शक्यता:
समोर आलेल्या माहितीनुसार, सरकारचे संक्रांतीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा (Majhi Ladki Bahin Yojana) हप्ता जमा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुढचा हफ्ता जमा करण्यात आल्यानंतर तुमच्या खात्यात हफ्त्याचे पैसे जमा होण्यात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास वरील हेल्पलाइन नंबरचा वापर करून त्वरित आपली तक्रार नोंदवा.