Majhi Ladki Bahin Yojana New Registration: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची अर्थीक मदत दिली जाते. लवकरच या योजनेअंतर्गत दरमहा 2100 रुपयांची मदत दिली जाणार आहे. (Majhi Ladki Bahin Yojana: New registration process starting soon! Learn eligibility, required documents, and how to apply for monthly financial aid of Rs. 2100 in Maharashtra).
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये ही योजना सुरु केली असून आत्तापर्यंत राज्यातील 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र अजूनही या योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित राहिल्या आहेत.
कागदपत्रांची कमतरता, वेळेचा अभाव आणी अशा अन्य काही कारणास्तव अनेक महिला या योजनेसाठी वेळेत अर्ज करू शकल्या नाहीत त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. अशा वेळेत अर्ज न करू शकलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची लवकरच पुनः एक संधी मिळणार आहे. या टप्प्यात सर्व महिलांना अर्ज करण्याची संधी मिळेल. व ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांना अर्ज मंजूर झालेल्या महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळेल.
त्यामुळेच जर याआधी तुम्ही काही कारणास्तव अर्ज करू शकला नसाल तर अर्ज प्रक्रिया सुरू होताच लगेच लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळू शकेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असने आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असले पाहिजे.
- सर्व विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत, निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- अर्ज करणाऱ्या महिलेचे कोणत्याही बँकेत खाते असले पाहिजे.
- महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
- मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- बँक पासबूक
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईज फोटो
माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी कधी सुरू होईल?
उपलब्ध माहितीनुसार, राज्यात नवीन सरकार स्थापन होताच राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता 2100 रुपये देण्यात येणार आहे आणी त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजनेसाठीची नवीन अर्ज प्रक्रिया सुरु होईल. म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या दरम्यान नवीन अर्ज प्रक्रिया सुरु होईल.
Majhi Ladki Bahin Maharashtra योजनेसाठी नवीन अर्ज कसा करायचा?
सध्या लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करता येत नाही. लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकामार्फत लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करू शकता.