मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन फॉर्म, लगेच जमा होतील पैसे? Mazi Ladki Bahin Yojana New Form

4 Min Read
Mazi Ladki Bahin Yojana New Form Maharashtra 2024

Majhi Ladki Bahin Yojana New Form : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असून यासाठी सरकारने नवीन जीआर काढला आहे.

Mazi Ladki Bahin Yojana New Form : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असून यासाठी सरकाकडून नवीन जीआर देखील काढण्यात आला आहे. ज्या महिलांनी अद्याप अर्ज भरला नाही, त्यांना आता नवीन लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज भरता येणार आहे. नवीन अर्ज बिनचूक भरल्यास तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात…

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जाऊन अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. अर्जदार नवीन असल्यास खाते तयार करा, यावर क्लिक करा. आणी आधारकार्डप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत टाईप लिहा. मोबाईलचा नंबर टाकून पासवर्ड सेट करा. जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर त्यावर ती निवडा. नसेल तर लागू नाही, यावर क्लिक करा. ऑथोराईज्ड पर्सनमध्ये तुमच्या प्रोफेशनुसार विकल्प निवडा. टर्म्स अँड कंडिशन्सवर क्लिक करून अॅक्सेप्ट करा. कॅप्चा भरा आणि साईन अपवर क्लिक करा. त्यानंतर तुमचं साईन इन यशस्वी होईल. त्यानंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. आणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा.

आधारकार्ड नंबर टाकून कॅप्चा भरा आणि व्हॅलिडेटे वर क्लिक करा. मग तुमचा फॉर्म ओपन होईल. त्यात महिलेचं संपूर्ण नाव इंग्रजीत लिहा. कॉलममध्ये वडिलांचे नाव लिहि. विवाहित असल्यास पतीचे नाव लिहा. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इंग्रजीत लिहा. वैवाहिक स्थितीमध्ये पर्याय निवडून इंग्रजीत माहिती भरा. आधारकार्ड प्रमाणे जन्मतारखेची नोंद करा. जन्मस्थान महाराष्ट्र असल्यास होय या पर्यायावर क्लिक करा. महाराष्ट्रात जन्म झाला नसल्यास ज्या ईतर राज्यात जन्म झाला असेल त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही कागदपत्रे अपलोड करा. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधारकार्डप्रमाणे लिहा. पिनकोड लिहा. आणी जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका/नगरपालिका निवडा. जो मतदारसंघ असेल, तो बिनचूक निवडा. तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक टाका.

तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला अर्जाच्या स्थितीबाबत मेसेज येतील. तुम्ही जर शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असल्यास तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आधारकार्डवर ज्या बँकेचे खाते लिंक आहे, त्या बँकेचा खाते नंबर व्यवस्थित चेक करून भरा. बँकेची इतर आवश्यक माहिती भरा. बँक खाते आधारकार्डशी लिंक असल्यास होयवर क्लिक करा. जर आधारकार्डसोबत बँक खाते लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा. आधारकार्डच्या समोरील बाजू पहिल्या पर्यायात अपलोड करा. दुसऱ्या पर्यायात आधारकार्डची मागची बाजू अपलोड करा.

तुम्ही अधिवास प्रमाणपत्र मध्ये तुमच्याकडे असलेला दाखला अपलोड करू शकता. केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास बरोबर पर्याय निवडा. रेशनकार्डची पहिली आणि दुसरी बाजू अपलोड करा. नसेल तर नाहीवर क्लिक करून उत्पन्नाचा दाखला अपलोड करा. अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करा. ते नसल्यास ऑनलाईन डाऊनलोड करा. हमीपत्रा मधील प्रत्येक पर्यायावर वाचून तो पर्याय तुम्हाला लागू होत असल्यास टीक मार्क करा. आणी सही करा.

शेवटी बँक पासबूक आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा. आणी डिल्केरेशनला क्लिक करून सबमिटवर क्लिक करा. हमीपत्र स्वीकारा यावार क्लिक करून शेवटी पुन्हा एकदा अर्ज तपासा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article