Mobile Users Warning Fake International Calls Report Telecom Department | मुंबई: भारतातील 120 कोटी मोबाइल यूजर्ससाठी सरकारने एक महत्त्वाची वॉर्निंग जारी केली आहे. सध्या काही हैकर्स इंटरनॅशनल नंबरवरून कॉल करत आहेत आणि यूजर्सना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात दूरसंचार विभागाने एक सूचना जरी केली आहे ज्यामध्ये असे कॉल स्वीकारू नका आणि त्वरित रिपोर्ट करा असे सूचित करण्यात आले आहे. (Government warns 120 crore mobile users about fake international calls. Learn which numbers to avoid and how to report them on the Chakshu portal for safety).
या नंबरवरून येणारे कॉल उचलू नका:
दूरसंचार विभागाने आपल्या ट्विटर हँडलवर काही इंटरनॅशनल नंबरसंबंधी माहिती दिली आहे, ज्यावरून कॉल्स येत आहेत. या नंबरमध्ये +77, +89, +85, +86, +87, +84 अशा नंबरचा समावेश आहे. यावरून कॉल करणारे लोक स्वतः TRAI किंवा DoT अधिकारी असल्याचे संगत आहेत आणि यूजर्सकडून माहिती मिळवून त्यांच्या माहितीचा वापर करत आहेत. त्यामुळे, या नंबरवरून आलेले कॉल कधीही उचलू नका.
चक्षु पोर्टलवर रिपोर्ट करा:
सरकारने यूजर्सना या फसव्या कॉल्सबद्दल तक्रार करण्यासाठी चक्षु पोर्टल(Chakshu Portal) सुरू केले आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचे इंटरनॅशनल नंबरवरून कॉल्स येत असतील, तर तुम्ही ते चक्षु पोर्टलवर त्वरित रिपोर्ट करा. यामुळे सरकार त्या नंबरला ब्लॅकलिस्ट करेल.
नवीन नियमांची अंमलबजावणी:
साईबर क्राईमला रोखण्यासाठी सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत. 1 ऑक्टोबरपासून फसवणूक करणाऱ्या कॉल्ससाठी दूरसंचार कंपन्यांना DLT (डिस्ट्रिब्युटेड लीडरशीप ट्रॅकिंग) सिस्टीम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. 11 डिसेंबरपासून, SMS ट्रेसिबिलिटी नियम लागू होणार आहे, ज्यामुळे फसव्या संदेशांचे ट्रॅकिंग सोपे होईल.
तुम्ही काय करू शकता?
जर तुम्हाला असे कॉल्स येत असतील, तर त्यांना कधीही उत्तर देऊ नका. चक्षु पोर्टलवर त्वरित रिपोर्ट करा आणि फसवणूकिपासून सुरक्षित राहा.