Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील महिलांना आर्थिक मदत दिली जाते. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana offers Rs. 1,500 monthly financial aid, free LPG cylinders, and skill development for women in Maharashtra. Learn eligibility, benefits, and how to apply).
योजनेची सुरूवात आणि उद्दिष्ट
28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेचे उद्दिष्ट महिलांना आर्थिक मदत देऊन शिक्षण व कौशल्यविकासासाठी प्रोत्साहन देणे आहे. मुलींच्या शाळा सोडण्याच्या संख्येत घट करणे, मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे, आणि महिलांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
पात्रता निकष
- वय: 21 ते 65 वर्षे.
- लाभार्थी महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न: रु. 2.5 लाखांपेक्षा कमी.
- लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत किंवा आयकर भरणारा नसावा.
योजनेचे फायदे
- महिन्याला रु. 1,500 आर्थिक मदत. (लवकरच 2100₹ दरमहा देण्याचे सरकारचे आश्वासन).
- वर्षातून 3 मोफत एलपीजी गॅस सिलिंडर.
- कौशल्य विकास प्रशिक्षण, आरोग्य सेवा, आणि आर्थिक सेवांमध्ये प्रवेश.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- उत्पन्नाचा पुरावा (पिवळे/केशरी रेशनकार्डधारकांना सूट)
- जन्म प्रमाणपत्र
- मतदान ओळखपत्र
- आधार लिंक केलेले बँक खाते अनिवार्य आहे.
अर्ज प्रक्रिया
Mazi Ladki Bahin Yojana ऑनलाइन अर्जासाठी:
- माझी लाडकी बहिण योजना अधिकृत पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.
- होमपेजवर ‘अर्जदार लॉगिन’ पर्याय निवडा.
- नवीन खाते तयार करण्यासाठी ‘Create an Account’ निवडा.
- आपले नाव, पत्ता, आणि इतर तपशील भरून फॉर्म पूर्ण करा.
- सर्व माहिती पुनरावलोकन करून ‘Sign Up’ क्लिक करा.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ऑफलाइन अर्जासाठी:
- आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरा.
- जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म सबमिट करा.