मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची बातमी Important News Regarding Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra

2 Min Read
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Installment Hike Maharashtra Cabinet Decision

मुंबई, ३ डिसेंबर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील गरजू महिलांना आर्थिक सहाय्य पुरवणे असून ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची अर्थीक मदत देण्यात येत असून महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी, राज्यात पुनः महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास योजनेच्या हफ्त्याची रक्कम वाढवून दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पात्र महिलांच्या खात्यात नोव्हेंबर पर्यंतच्या हफ्त्याचे पैसे जमा करण्यात आले असून महिला आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. (Majhi Ladki Bahin Yojana update: Maharashtra’s new cabinet to decide on increasing the monthly installment from ₹1,500 to ₹2,100. Scheme aimed at aiding women aged 21-65 from poor families).

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री ५ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथ घेतील. त्यानंतर होणाऱ्या नवीन सरकारच्या कॅबिनेट बैठकीत नवीन सरकार योजनेचा आढावा घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हफ्त्याची तारीख जाहीर करेल. आणी त्यानंतर पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ दिला जाईल.

🔴 हेही वाचा 👉 PMVY 2025 :योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जाहीर.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक ₹१५०० हफ्त्याची रक्कम वाढवून ₹२१०० करण्याचा निर्णय नुकताच होणार नसून सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना डिसेंबर महिन्यातही 1500 रुपयांचाच हफ्ता देण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

योजनेतील बदलांबाबत पुढील माहिती लवकरच जाहीर होईल.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना कधी मिळेल वाढीव रक्कम.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now