Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Installment Hike Update : माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली आर्थिक लाभ हस्तांतर योजना आहे. ही योजना विशेषतः ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी लागू आहे. (Maharashtra CM Devendra Fadnavis announces Ladki Bahin Yojana update: monthly allowance to increase from ₹1,500 to ₹2,100. Decision expected in upcoming budget session).
योजनेतील बदलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की, या योजनेतील महिलांना सध्या मिळणारी ₹१,५०० ची रक्कम वाढवून दरमहा ₹२,१०० केली जाणार आहे. मात्र, ही वाढ महायुती सरकारच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचाराधीन असेल.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल? आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सातत्याने सुरु राहणार आहे आणि या योजनेअंतर्गत देण्यात येणारा दरमहा ₹१,५०० चा हफ्ता ₹२,१०० करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. परंतु, ही वाढ अर्थसंकल्पानंतरच शक्य होईल. तसेच, सर्व अर्जांची काटेकोरपणे तपासणी केली जाईल, जेणेकरून फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळेल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
🔴 हेही वाचा 👉 पुढचा हप्ता कधी येणार? पात्रतेसंदर्भात मोठा निर्णय!.
महायूती सरकारचे उद्दिष्ट:
महायूती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यातील २.४ कोटी लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर या पच महिन्यांचे हप्ते यशस्वीपणे वितरित केले आहेत. तरीही, काही अपात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळाल्याचे निदर्शनास आल्याने या योजनेत सुधारणा करण्यात येत आहे.
🔴 हेही वाचा 👉 नवीन सरकारकडून सहाव्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट.
सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण:
योजनेतील रक्कमवाढीचा अंतिम निर्णय नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले. ही योजना कायम ठेवत लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढवणे सरकारचे लक्ष्य आहे. असं ते म्हणाले.
🔴 हेही वाचा 👉 आता लाभ मिळण्यासाठी ‘इतक्या’ वर्षांचा महाराष्ट्रातील रहिवास आवश्यक.
योजनेचे महत्त्व:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा महत्वाचा स्त्रोत बनत आहे. भविष्यातील अर्थसंकल्पात या योजनेला आणखी सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.