Majhi Ladki Bahin Yojana Latest News : सध्या महाराष्ट्रातील जवळपास 2.50 कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ मिळत आहे. जर तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला देखील या योजनेतून आर्थिक लाभ मिळू शकतो. (Majhi Ladki Bahin Yojana provides eligible Maharashtra women with financial aid up to INR 25,200 per year. Learn about eligibility, benefits, and application process in this scheme).
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024: महाराष्ट्रात चालू असलेल्या अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजनांपैकी एक फायदेशीर योजना (Maharashtra Government Scheme 2024) म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ही योजना महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाते या योजनेचा लाभ राज्यातील पात्र महिलांना मिळतो. जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही या योजनेत सहभागी होऊन लाभ घेऊ शकता. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना सरकारकडून सध्या दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. परंतु तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल की नाही? चला तर मग जाणून घेऊयात कुणाला या योजनेचा लाभ मिळतो…
Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Criteria In Marathi | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहेत?
जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर आधी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे कारण ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळतो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असने आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान मध्ये असले पाहिजे.
- सर्व विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत, निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- अर्ज करणाऱ्या महिलेचे कोणत्याही बँकेत खाते असले पाहिजे.
- महिलेचा कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या महिला अपात्र
- ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल.
- ज्या कुटुंबातील महिला सदस्य आयकर भरतात.
- कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर आर्थिक योजनांद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल.
- ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार असेल.
- ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे (ट्रॅक्टर वगळून).
मिळतील वर्षाला 25200 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना सध्या दरमहा 1500 रुपये म्हणजेच वार्षिक 18000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार, जर महाराष्ट्रात पुनः महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेली दरमहा 1500 रुपयांची रक्कम वाढवून महिलांना दरमहा 2100 रुपये म्हणजेच वर्षाला 25200 रुपये देण्यात येतील.
🔴 हेही वाचा 👉 नेमकी काय आहे महालक्ष्मी योजना? या योजनेची का होतेय सर्वत्र ईतकी चर्चा.