Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्याांचे दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगता यावे यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana) या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यातील वय वर्षे 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या जेष्ठ नागरीकांच्या खात्यात 3 हजार रूपये जमा करणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ कुणाला घेता येणार? या योजनेसाठी पात्रता निकष काय आहे? मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनदिन जीवन सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन: स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र उपलब्ध करणे. मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने पात्र लाभार्थींना मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून 3000 रूपये थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांची शारीरीक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधणे, उपकरणे यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टीक, व्हीलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी खरेदी करता येणार आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?
- * आधारकार्ड/ मतदान कार्ड
- * पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- * राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स
- * स्वयं-घोषणाफत्र
- * शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे पात्रता निकष काय?
- * लाभार्थ्याने 31 डिसेंबर, 2023 अखेर वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावीत.
- * लाभार्थ्याचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्डची पावती देखील चालणार आहे.
- * आधारकार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असावे.
- * लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योनजे अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो.
- * लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
Mukhyamantri Vayoshri Yojana Form
- मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. (मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा फॉर्म येथे डाउनलोड करा). हा फॉर्म व्यवस्थित भरून. ग्रामपंचायत ऑफिस मध्ये सबमिट करा.
- फॉर्ममध्ये पासपोर्ट साईज फोटो चिकटवा. आणी तुमचे संपूर्ण नाव, तुमचे वय, व्यवसाय, गावाचे नाव, तालुका, जिल्हा आणी विचारलेली ईतर माहिती भरा.
- तुम्हाला मागील तीन वर्षांत तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाही याबद्दलचे घोषणापत्र भरायचे आहे. फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म जमा करा.