योजनादूत म्हणून काम केल्याने महिन्याला रू.10000 सोबतच मिळतील ‘हेही’ फायदे, Mukhyamantri Yojana Doot

3 Min Read
Mukhyamantri Yojana Doot Benefits

Mukhyamantri Yojana Doot Bharti : योजनादूत ही महाराष्ट्र सरकारची (Maharashtra Government) नाविन्यपूर्ण योजना आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील 50000 तरुणांची निवड केली जाणार आहे. योजनादूत म्हणून निवड झालेल्या तरुणांना विद्यावेतन म्हणून महिन्याला रू.10000 दिले जाणार आहेत. पण याचा कालावधी 6 महिनेच असल्याने अनेक तरुणांना प्रश्न पडलाय की, हे काम फक्त 6 महिनेच असणार. मग पुढे काय? कशाला हे काम करायचं? पण योजनादूत म्हणून काम केल्याने तरुणांना भविष्यात अनेक फायदे मिळू शकतात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र सरकारी योजनांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्यातील अशा काही योजना आहेत ज्या सुरु तर करण्यात आल्या पण प्रचाराच्या आभावामुळे त्या सामान्य जनतेपर्यंत कधी पोहोचूच शकल्या नाहीत. म्हणूनच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची संधी आता तरुणांना दिली जात आहे.

योजनादूत इंटर्नशिपचा कमाल कालावधी फक्त 6 महिने आहे ही गोष्ट खरी आहे. योजनादूत म्हणून निवड झालेल्या तरुणांना या कालावधीत विद्यावेतन म्हणून महिन्याला 10000 रुपये मिळतील. पण यासोबतच 6 महिने योजनादूत म्हणून काम केल्याने तुम्हाला याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.

योजनादूत म्हणून काम केल्याने मिळणारे फायदे

योजनादूत म्हणून काम केल्याने विद्यावेतनातून आर्थिक साहाय्य तर मीळेलच सोबत तुम्हाला सरकारी यंत्रनेसोबत कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मीळेल. तुमचे समाजात वावरण्याचे आणी बोलण्याचे कौशल्य सुधारेल. इंटर्नशिप कालावधी पूर्ण होताच राज्य सरकारकडून तुम्हाला योजनादूत म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र मीळेल, या सरकारी प्रमाणपत्राचा भविष्यात तुम्हाला खुप उपयोग होऊ शकतो. तुम्ही भविष्यात कोणतेही मार्केटिंगचे काम करणार असाल तर ते काम मिळवून देण्यात हे योजनादूत म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र तुमच्या कामी येईल. इतकेच नाही, इंटर्नशिप कालावधी पूर्ण होताच तुम्हाला सरकारी योजनांची चांगलीच माहिती झाली असेल त्यामुळे तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना संबंधित ऑनलाईन पोर्टल, सरकारी योजना बातम्या वेबसाइट, ऑनलाईन न्यूजपेपर मध्ये लेखक म्हणून सहज काम मिळू शकते.

योजनादूत साठी अर्ज करण्यासाठी पात्रता आणी आवश्यक कागदपत्रे

  • * अर्जदाराचे वय १८ ते ३५ दरम्यान असावे
  • * कोणत्याही शाखेचे पदवी प्रमापात्र
  • * संगणक प्रमाणपत्र (MSCIT) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • * आधार कार्ड
  • * रहिवासी दाखला

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article