PAN 2.0: केंद्र सरकारने डिजिटल इंडिया अभियानाला पाठबळ देत PAN 2.0 प्रकल्प जाहीर केला आहे. यामुळे पॅन कार्डच्या सेवांमध्ये QR कोडसारख्या अत्याधुनिक सुविधा जोडल्या जातील. सरकारच्या या योजनेमुळे नवीन पॅन कार्ड बनवणे, अपडेट करणे आणि सुधारणा करणे पूर्णपणे मोफत असेल. मात्र, फिजिकल QR कोड पॅनसाठी ₹50 शुल्क लागेल आणि परदेश डिलीव्हरीसाठी अतिरिक्त ₹15 तसेच पोस्टाचे शुल्क भरावे लागेल.
ईमेलवर PAN 2.0 मिळवण्यासाठी प्रक्रिया
PAN 2.0 अद्याप पूर्णतः सुरु नाही. पण, करदात्यांना त्यांच्या ईमेलवर ई-पॅन मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ई-पॅन मिळवण्यासाठी स्टेप्स:
- NSDL वेबसाइटला भेट द्या.
- आपला PAN नंबर, आधार कार्ड क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
- आवश्यक माहिती भरून चेकबॉक्स टिक करा आणि सबमिट करा.
- रजिस्टर मोबाईलवर आलेल्या OTP द्वारे माहिती व्हेरिफाय करा.
- पेमेंट पर्याय निवडून “Proceed to Payment” वर क्लिक करा.
- यशस्वी पेमेंटनंतर, ई-पॅन आपल्याला 30 मिनिटांच्या आत ईमेलवर पाठवले जाईल.
जर ई-पॅन वेळेत मिळाले नाही तर tininfo@proteantech.in वर ईमेल करा किंवा 020-27218080/81 वर संपर्क साधा.
🔴 हेही वाचा 👉 500 रुपयांच्या नोटांसाठी नवीन नियम! जाणून घ्या काय आहेत आरबीआय आणि सरकारची नवीन मार्गदर्शक तत्वे.
PAN 2.0 च्या प्रमुख सुविधा
- QR कोड: नवीन तंत्रज्ञानासह कार्ड अधिक सुरक्षित.
- डिजिटल सेवा: पॅन आणि टॅन सेवांचे डिजिटल ऑपरेशन.
- सोपे अपडेट्स: ई-पॅन विनामूल्य मिळणार, कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही.
सध्याच्या PAN कार्डचे काय?
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की सध्याचा पॅन नंबर बदलला जाणार नाही. फक्त सध्याच्या पॅन कार्ड धारकांना नवीन QR कोडसह असलेले पॅन कार्ड मिळेल.