How to Apply for PM Awas Yojana: केंद्र सरकारद्वारे २०१५ ला ‘सर्वांसाठी घरे’ पंतप्रधान आवास योजना या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. ग्रामीण आणी नागरी अशा दोन भागात ही योजना विभागण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊयात…
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीन कोटी नवीन घरं बांधून देण्याचा निर्णय जून महिन्यात पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पंतप्रधान आवास योजनेचे प्रकार
- * पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G)
- * पंतप्रधान आवास योजना शहरी (PMAY-U)
पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता
- * अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
- * अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- * अर्जदार सरकारी नोकरदार नसावा.
- * अर्जदार करदाता नसावा.
- * अर्ज करणाऱ्यांच्या नावाने आधीपासून घर नसावे.
- * अर्जदाराने योजनेचा आधी लाभ घेतला नसावा.
- * ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- * शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- * अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- * ईडब्ल्यूएस कोट्यातील लोकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- * पॅन कार्ड
- * आधार कार्ड
- * बँक पासबुक
- * बीपीएल कार्ड
- * जात प्रमाणपत्र
- * मोबाईल नंबर
- * उत्पन्नाचा दाखला
- * पासपोर्ट साइझ फोटो
- * रहिवासी दाखला
- * ईमेल आयडी
पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:
- * पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जावा.
- * वेबसाइटच्या होम पेज वर असणाऱ्या ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
- * अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरा.
- * आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- * आणी सबमिट सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पीएम आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करायचा?
पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जावा. जाताना तुमचा आधार लिंक मोबाईल आणी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे बरोबर घेऊन जा. आणी तेथील अधिकाऱ्यांना भेटून तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करायचा असल्याचे सांगा. त्यानंतर अधिकारी तुमची पात्रता आणी तुमची सर्व कागदपत्रे तपासतील आणी तुम्ही जर योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला मदत करतील.