प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी लागतात ही कागदपत्रे, संपूर्ण यादी पहा PM Awas Yojana News in Marathi

2 Min Read
Pm Awas Yojana Documents Required

PM Awas Yojana Documents in Marathi : भारतात आजही असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे त्यांचे हक्काचे घर नाही. आणी ही अवस्था फक्त ग्रामीण भागाचीच नाही तर शहरी भागात देखील असेच दृश्य  पाहायला मिळते. म्हणूनच अशा लोकांना त्यांच्या हक्काची घरे बांधून देण्यासाठी भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्यांच्याकडे कच्ची घरे आहेत त्यांना पक्की घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की पीएम आवास योजनेसाठी अर्ज करन्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? नसल्यास, जाणून घ्या.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी  ही कागदपत्रे आवश्यक आहेत

जर तुम्हाला पीएम आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही काही कागदपत्रांची आवश्यकता असते ती खालील प्रमाणे:

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदार ओळखपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
वाहन चालविण्याचा परवाना
पत्त्याचा पुरावा
उत्पन्न प्रमाणपत्र
मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे
मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
जात प्रमाणपत्र

अशा प्रकारे तुम्ही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊ शकता:

तुम्ही जर पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करू शकता.

  • 1: सर्वप्रथम pmaymis.gov.in या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावा.
  • 2: त्यानंतर ‘Citizen Assessment’ या पर्यायावर क्लिक करा.
  •  3: तुमची श्रेणी निवडा.
  • 4: तुमच्या आधार कार्डची माहिती भरा.
  • 5: तुमचा ऑनलाइन अर्ज भरा आणि तो सबमिट करा.

अशा प्रकारे तुम्ही PM आवास योजनेसाठी अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article