PM Awas Yojana News in Marathi | PM आवास योजना बातमी: केंद्र सरकार राबवत असलेल्या PM आवास योजनेचा देशभरातील लोक खूप मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. आपल्या भारत देशात असे करोडो गरीब लोक आहेत ज्यांना राहण्यासाठी पक्की घरे नाहीत. ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) राबवत आहे. ही योजना सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत, भारत सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत करते. पीएम आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठीचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊन देशातील अनेक बांधव पक्की घरे बांधून घेत आहेत. पण अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी त्यांच्या घरात किती खोल्या बनवू शकतात? PM आवास योजनेंतर्गत तुम्ही किती जागेत तुमचे घर बांधू शकता ते जाणून घेऊयात…
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत तुम्ही किती जागेत तुमचे घर बांधू शकता ते जाणून घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांच्या बांधकामासाठी चार श्रेणी तयार केल्या गेल्या आहेत – EWS, LIG, MIG -I, MIG -II.
- * EWS श्रेणी अंतर्गत, अर्जदार 30 चौरस मीटरमध्ये घर बांधू शकतात.
- * LIG श्रेणी अंतर्गत, अर्जदार 60 चौरस मीटरमध्ये घर बांधू शकतात.
- * MIG-1 श्रेणी अंतर्गत, अर्जदार 160 चौरस मीटरमध्ये घर बांधू शकतात.
- * MIG-II श्रेणी अंतर्गत, अर्जदार 200 चौरस मीटरमध्ये घर बांधू शकतात.
PM आवास योजनेचा लाभ कमी उत्पन्न गट (LIG), आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांच्यासाठी उपलब्ध आहे.
तुम्ही पीएम आवास योजनेचा ऑनलाईन अर्ज करून देखील लाभ घेऊ शकता.
🔴 हेही वाचा 👉 पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन आणी ऑफलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या PM Awas Yojana Apply Online Maharashtra.