PM Free Recharge Yojana: तीन महिन्यांचा मोफत रिचार्ज? जाणून घ्या नेमकी काय आहे ही योजना, जाणून व्हाल थक्क

2 Min Read
PM Free Recharge Yojana Fake Message Alert

PM Free Recharge Yojana : WhatsApp आणि सोशल मीडियावर पंतप्रधान फ्री रिचार्ज योजना या नावाखाली एका बनावट संदेशाचा प्रसार होत आहे. या संदेशामध्ये दावा केला जातो की, सर्व भारतीय युजर्सना तीन महिन्यांचा मोफत रिचार्ज दिला जात आहे. तथापि, सरकारकडून अशा कोणत्याही योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Beware of fake PM Free Recharge Scheme messages on WhatsApp! No such scheme exists. Learn how to protect your personal information and avoid online scams.).

फेक मेसेजमागचा हेतू

या प्रकारातील फसवणुकीचा उद्देश लोकांची वैयक्तिक माहिती मिळवणे असते. संदेशामध्ये दिलेल्या ब्लू लिंकवर क्लिक केल्यास युजर्सची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. ही माहिती बँक खात्यांसाठी, ओळखपत्रांसाठी, किंवा इतर आर्थिक फसवणुकीसाठी वापरली जाऊ शकते.

सरकारकडून काय सांगण्यात आले आहे?  

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक टीमने देखील हा मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे. अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक टीमकडून करण्यात आले आहे.  

यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटना  

याआधीही अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या, जसे की, लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारच्या नावाने मोफत रिचार्ज दिला जात असल्याचे दावा करणारे मेसेज व्हायरल झाले होते. तसेच सरकारने विध्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना (Free Laptop Yojana) सुरु केली आहे.

सावधगिरी कशी बाळगाल?

  1. लिंकवर क्लिक करू नका: मेसेजसोबत आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.  
  2. वैयक्तिक माहिती भरू नका: वैयक्तिक माहिती शेअर करू नका.  
  3. फॅक्ट-चेक करा: कोणताही मेसेज आधी अधिकृत स्त्रोतांकडून तपासून घ्या.  
  4. PIB फॅक्ट चेकला संपर्क करा: संशयास्पद मेसेज आल्यास PIB फॅक्ट चेकशी संपर्क साधा. 

तुमच्या सुरक्षिततेची काळजी घ्या

अशा मेसेजना बळी पडल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून, कोणत्याही योजना किंवा ऑफरबाबत खात्री करण्याआधी अधिकृत सरकारी घोषणांवर विश्वास ठेवा.  

“सरकारी योजनांच्या ताज्या बातम्यांसाठी marathisarkariyojana.in वेबसाइटला भेट द्या किंवा गूगलवर व्हॉइस सर्च करा – ‘मराठी सरकारी योजना’ आणि मिळवा महाराष्ट्र सरकारच्या योजनांची सर्व माहिती, एका आवाजात!” 

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now