PM Shram Yogi Maandhan Yojana Registration Benefits: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे आहे. (Learn about PM Shram Yogi Maandhan Yojana offering ₹36,000 annual pension with a small monthly contribution. Check eligibility, benefits, and registration process for unorganized workers).
योजना कशासाठी?
ही योजना हमाल, रिक्शा चालक, सफाई कामगार, फळ व भाजी विक्रेते, भूमिहीन शेतमजूर अशा कामगारांसाठी आहे.
नोंदणीची आकडेवारी:
- एकूण नोंदणी: 45,77,131
- महिला: 53.1%
- पुरुष: 46.9%
- महाराष्ट्रातील नोंदणी: 10,154
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
- असंघटित क्षेत्रातील कामगार
- मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असलेले व्यक्ती
- 18 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिक
- EPFO, NPS किंवा ESIC अंतर्गत समाविष्ट नसलेले व्यक्ती
किती करावे लागते योगदान?
- 18 वर्षे वय: दरमहा 55 रुपये (वर्षाला 660 रुपये)
- 40 वर्षे वय: दरमहा 200 रुपये (वर्षाला 2400 रुपये)
योजनेत सहभागी झाल्यावर वयोमानानुसार 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळते.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाइल नंबर
नोंदणी प्रक्रिया
How to apply for mandhan yojana in marathi: तुमच्या जवळच्या जन सेवा केंद्रावर जाऊन, आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करू शकता.
ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जीवनसुरक्षा देणारी एक अतिशय फायदेशीर योजना आहे.