प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना नेमकी काय आहे? तुम्ही या योजनेचा कसा लाभ घेऊ शकता? PM Vidyalakshmi Yojana 2024

2 Min Read
PM Vidyalakshmi Yojana Education Loan Benefits

PM Vidya Lakshmi Education Loan Yojana 2024 :  प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही भारत सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे (Government Scheme For Students). या योजनेचा उद्देश आर्थिक कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारे आर्थिक सहाय्य पुरवणे हा आहे. (PM Vidyalakshmi Yojana offers financial assistance up to INR 10 lakh for economically weaker students pursuing higher education. Learn about eligibility, benefits, and application process).

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना नेमकी काय आहे?

  • – या योजनेंतर्गत विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कोणत्याही हमीशिवाय बँक आणि वित्तीय संस्थांकडून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.
  • – 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 75 टक्के क्रेडिट गॅरंटी सरकारकडून दिली जाते.
  • – ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 4.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना कर्जावरील व्याजावर संपूर्ण अनुदान मिळते.
  • – वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज अनुदान मिळते.

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे:

https://www.vidyalakshmi.co.in/Students/

या वेबसाइटवरून विद्यार्थी सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि आवश्यक असलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची माहिती मिळवू शकतात.

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेचे फायदे

  • – कोणत्याही हमीशिवाय कर्जाची उपलब्धता.
  • – क्रेडिट गॅरंटी आणि व्याजावर अनुदान.
  • – उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा मोठा स्रोत, ज्यामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट राहू नये.

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध करून देते.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article