QR Code Pan Card Apply Online Process: सरकारने Pan Card 2.0 लॉन्च केलं असून, त्याअंतर्गत QR कोड असलेलं New Pan Card मिळवण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे पॅन कार्ड अधिक सुरक्षित आणि आधुनिक बनलं आहे. आता, आपल्याला घरबसल्या QR कोड असलेल नव पॅन कार्ड मिळवता येईल. यासाठी आपल्याला फक्त 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. (Learn how to apply for the new QR Code PAN Card 2.0 online. Follow the step-by-step process to get your reprinted PAN with a QR code. Quick, secure, and digital).
QR Code Pan Card 2.0 – अधिक सुरक्षित आणि सुलभ
QR कोड असलेलं पॅन कार्ड एक नवीन आणि सुरक्षित प्रणाली वापरून तयार करण्यात आले आहे. हे पॅन कार्ड अधिक सुरक्षित असलं तरी, हे पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि यामध्ये आपल्याला विविध सुधारणाही करता येतात. नवीन पॅन कार्ड आपल्या रजिस्टर्ड ईमेल आणि पत्यावर पाठवले जाईल.
QR Code Pan Card 2.0 साठी कुठे अर्ज करायचा?
सरकारने नवीन पॅन कार्ड जारी करण्यासाठी दोन अधिकृत एजन्सी नियुक्त केल्या आहेत – प्रोटीन (पूर्वी NSDL) आणि UTIITSL. अर्ज करण्यासाठी, आपल्याला आपल्या पॅन कार्डच्या मागे दिलेल्या एजन्सीचा तपशील पाहावा लागेल.
QR Code Pan Card 2.0 साठी अर्ज कसा करावा – स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
प्रोटीन (NSDL) वर अर्ज करण्याची प्रक्रिया:
- सर्वप्रथम प्रोटीन वेबसाइटवर जा.
- आवश्यक माहिती जसे पॅन नंबर, आधार आणि जन्मतारीख भरा.
- ‘सबमिट’ करण्यापूर्वी, आयकर विभागाच्या अद्ययावत तपशीलांची पडताळणी करा.
- OTP मिळवण्यासाठी आपला मोबाइल किंवा ईमेल निवडा.
- OTP प्रमाणिकरण केल्यानंतर, 50 रुपये शुल्क भरा.
- पेमेंट झाल्यावर, 24 तासांमध्ये डिजिटल पॅन डाउनलोड करा. फिजिकल पॅन कार्ड 15-20 दिवसांत आपल्याला मिळेल.
UTIITSL वर अर्ज करण्याची प्रक्रिया:
- UTIITSL च्या वेबसाइटवर जा.
- आवश्यक माहिती भरा आणि ‘रीप्रिंट पॅन कार्ड’ निवडा.
- नंतर प्रोटीन सारख्याच स्टेप्स फॉलो करा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
नवीन QR कोड पॅन कार्डचा फायदाः
नवीन पॅन कार्ड अधिक सुरक्षित असून, हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. पॅन कार्ड धारक आता त्यांच पॅन कार्ड आपल्या स्मार्टफोनमध्ये देखील ठेवू शकतात आणि आवश्यक वेळेस स्कॅन करून माहिती तपासू शकतात. यामध्ये कोणत्याही प्रकाराची माहिती बदलण्याची प्रक्रिया देखील सुलभ केली आहे, ज्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही.
QR Code Pan Card 2.0 सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेस साजेसं आहे. आता तुम्ही घरबसल्या, सोप्या पद्धतीने आणि कमी शुल्कात नवीन पॅन कार्ड मिळवू शकता. हे पॅन कार्ड तुमच्या सुरक्षिततेसाठी फायदेशीर ठरू शकतं आणि यामुळे भविष्यातील सर्व सरकारी प्रक्रिया सुलभ होईल.