Sukanya Samriddhi Yojana (SSY) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक लहान बचत योजना आहे, जी 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींना आर्थिक सुरक्षा देण्याच्या आणि त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या उद्देशाने सुरू केली होती. ही योजना “बेटी बचाओ बेटी पढाओ” मोहिमेचा एक भाग आहे आणि मुलींच्या शिक्षण आणि लग्नाशी संबंधित आर्थिक भार कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
सुकन्या समृद्धि योजनेचे फायदे
सुकन्या समृद्धि योजने मध्ये गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा लाभ मिळतो आणि चांगले व्याजही मिळते. या योजनेअंतर्गत 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी खाते उघडता येते. यामध्ये दरवर्षी किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेतून मिळणाऱ्या पैश्यावर कोणताही कर भरावा लागत नाही.
सुकन्या समृद्धि योजनेत मिळणारा व्याज दर
सुकन्या समृद्धी योजनेतील व्याज दर तीन महिन्याच्या कालावधीसाठी ठरवला जातो. सध्या हा दर जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 पर्यंत वार्षिक 8.2% आहे, हे व्याज चक्रवाढ व्याजाच्या स्वरूपात दिले जाते.
सुकन्या समृद्धि योजनेत गुंतवणूक आणि परतावा
जर तुमची मुलगी 5 वर्षांची असेल आणि तुम्ही वार्षिक 1.2 लाख रुपये म्हणजेच महिन्याला 10,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला 21 वर्षांनंतर योजनेच्या मॅच्युरिटीवर अंदाजे रु. 55.61 लाख रुपये मिळतील. यामध्ये 17.93 लाख रुपये तुमची गुंतवलेली रक्कम असेल आणि 37.68 लाख रुपये व्याज मीळेल.
जर तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 69.8 लाख रुपये मिळतील, त्यातील 22.5 लाख रुपये गुंतवलेली रक्कम असेल आणि 47.3 लाख रुपये व्याज म्हणून मिळतील.
सुकन्या समृद्धि योजनेचा लॉक-इन कालावधी
सुकन्या समृद्धि योजनेचा लॉक-इन कालावधी 21 वर्षांचा आहे. म्हणजेच समजा, तुमच्या मुलीचे खाते 5 वर्षांच्या वयात उघडले असेल तर ते 26 वर्षांच्या वयात परिपक्व होईल. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचा एक उत्तम पर्याय आहे.