Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today : माझी लाडकी बहीण योजना बातमी: महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजना’ अत्यंत लोकप्रिय ठरली असून, राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणून समोर आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलाांना आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. तथापि, या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, अनेक अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. (Verification process continues for the Ladki Bahin Yojana. Find out more about the ongoing verification and future installments of the scheme).
समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून, लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया निरंतर सुरू आहे. तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या उर्वरित अर्जांची छाननी लवकरच सुरू केली जाणार असून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे.
🔴 मोठी बातमी वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठे बदल, लवकरच अंमलबजावणी.
लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीसंबंधित महत्त्वाची माहिती
Majhi Ladki Bahin Yojana Update News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण २ कोटी ५२ लाख लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर नव्याने आलेल्या अर्जांची छाननी बंद होती. आता लवकरच अर्ज छाननी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
🔴 हेही वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 2100 देणार की नाही? भाजपने दिले स्पष्ट संकेत!.
माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता
Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment Update: महिला व बालकल्याण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर केली जाणार असून. अंतिम यादी प्रसिद्ध होताच पात्र महिलांच्या खात्यात तातडीने 6व्या हफ्ताची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, 6व्या हफ्त्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील की 2100 रुपये याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.
🔴 लेटेस्ट अपडेट 👉 या महिलांचे अर्ज बाद, सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा.