आधार कार्ड संबंधित हे महत्वाच काम करायचं विसरलात? उरलेत फक्त 5 दिवस, अंतिम मुदत संपत आली Aadhaar Free Update

2 Min Read
Aadhaar Free Update Deadline September 2024

Aadhaar Free Update Deadline | आधार मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत: UIDAI द्वारे मोफत आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्याची मुदत या महिन्यात संपणार आहे मुदतीनंतर तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. (Aadhaar free update ends on 14th September 2024! Hurry to update your Aadhaar online for free via the myAadhaar portal before the deadline. Don’t miss out)…

UIDAI ने सध्या 10 वर्ष जुने आधार कार्ड पूर्णपणे मोफत अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि याची अंतिम मुदत 14 सप्टेंबर 2024 ही आहे. अशा परिस्थितीत, हे काम करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 5 दिवस शिल्लक आहेत, म्हणजेच तुम्ही फक्त पुढचे 5 दिवसच तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकणार आहात त्यानंतर याच कामासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. 

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

UIDAI कडून या आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या सुविधेची मुदत यापूर्वी अनेक वेळा वाढवण्यात आली आहे त्यामुळेच आता अशा परिस्थितीत ही मोफत सेवा आणखी वाढवण्याची आशा फारशी दिसत नाही. त्यामुळेच, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड अद्याप अपडेट केले नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. 

मुदतीनंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. आणी विशेष बाब म्हणजे UIDAI द्वारे प्रदान केलेली आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची ही सुविधा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. ऑफलाइन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सध्याही पैसे भरावे लागत आहेत.

असं करा आधार कार्ड मोफत अपडेट

आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.  होमपेजवरील My Aadhaar पोर्टलवर जा आणि आधार क्रमांक-नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेल्या OTP सह लॉग इन करा. यानंतर, तुमचे तपशील तपासा आणि तपशील बरोबर असल्यास, बरोबर आहे बॉक्सवर टिक करा. डेमोग्राफिक माहिती चुकीची आढळल्यास, ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख दस्तऐवज निवडा आणि दस्तऐवज अपलोड करा. लक्षात ठेवा की हा दस्तऐवज फक्त JPEG, PNG आणि PDF या स्वरूपात अपलोड केला जाऊ शकतो.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article