Aadhar Bank Seeding Status: जर कोणत्याही सरकारी योजनेचे किंवा सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार असतील तर त्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. याच कारणामुळे ऑगस्ट महिन्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत. तुमच्याही बँक खात्यात कोणत्याही सरकारी योजनेचे किंवा अनुदानाचे पैसे जमा होणार असतील तर तुमचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते चेक करा आणी जर ते लिंक नसेल तर लगेच ते लिंक करून घ्या. (how to check aadhaar bank seeding status)…
तुमचे बँक खाते आधारकार्डशी लिंक आहे की नाही ते असं तपासा
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया माय आधारच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तुम्ही तुमचे कोणते बँक खाते आधारकार्डशी लिंक आहे, हे सहज तपासू शकता. जर तुम्हाला तुमचे आधार बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचे असेल, तर खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा.
- 1: आधार बँक खात्याशी लिंक आहे की नाही तपासण्यासाठी https://uidai. gov.in/ या आधारच्या अधिकृत पोर्टलवर जावा.
- 2: माय आधार टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप डाऊन मेनूवर जा आणि आधार सेवा निवडा आणी आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करा.
- 3: तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक दिसेल.
- 4: सेंड ओटीपीवर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी टाका.
- 5: ओटीपी टाकल्यानंतर आता तुम्हाला समजेल की तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे.
आधार बँक खात्याशी लिंक नसल्यास?
जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिक नसेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन आधार लिकचा फॉर्म भरावा लागेल. त्यासाठी बँकेत जाताना तुम्हाला तुमचे बँक पासबुक, आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल आणी पॅन कार्ड सोबत घेऊन जावे लागेल.