Gold Price Trend India Last 5 Years: भारतात गेल्या पाच वर्षांत, सोन्याच्या दरामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. 2019 साली 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹32,000 प्रति 10 ग्रॅम होता, जो आज, डिसेंबर 2024 मध्ये ₹76,200 ते ₹78,000 प्रति 10 ग्रॅम च्या दरम्यान आहे. 2019 ते 2024 या 5च वर्षात सोन्याचा दर (Gold Rate) जवळपास 2.5 पट वाढला आहे. ही वाढ अनेक जागतिक आणि स्थानिक कराणांमुळे झाली आहे. (Gold prices soared from ₹32,000 in 2019 to ₹78,000 in 2024, marking a 2.5x increase. Explore the reasons behind this surge and its impact on investments and the economy).
🔴 आजचा सोन्याचा दर 👉 सोन्याची आजची किंमत ४ डिसेंबर २०२४.
मागील 5 वर्षात झालेल्या सोन्याच्या दरवाढीची कारणे
जागतिक पातळीवर परिणाम करणारे घटक:
- कोविड-19 महामारी: 2020 च्या कोरोना महामारीमुळे गुंतवणूकदारांनी (Gold Investment) सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढवली, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढली.
- जागतिक आर्थिक मंदी: डॉलरच्या घसरत्या किमतीमुळे आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली.
- युक्रेन-रशिया युद्ध: 2022 च्या युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक राजकीय अस्थिरता निर्माण झाली, ज्यामुळे सोन्याच्या किमतीला चालना मिळाली.
सोन्याच्या दरवाढीमागील भारतातील स्थानिक कारणे:
- कमी झालेली रुपयाची किंमत: 2019 पासून रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत गेल्यामुळे आयात केलेल्या सोन्याचा खर्च वाढला.
- सोन्याच्या मागणीत वाढ: लग्नसराई आणि सणासूदीच्या काळात सोन्याच्या मागणीत झालेली वाढ.
🔴 हेही वाचा 👉 भारतातील ‘या’ राज्यात मीळत सर्वात स्वस्त सोन, यामागे चोरी हे देखील आहे एक कारण.
दरवाढीचे परिणाम
- गुंतवणूकदारांचा मोठा फायदा: ज्यांनी 2019 मध्ये सोन्यात गुंतवणूक केली होती त्यांना मोठा नफा मिळाला आहे.
- सामान्य ग्राहकांवर परिणाम: सोनं महाग झाल्यामुळे दागिन्यांची खरेदी कमी झाली; पर्यायी गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढला.
- उद्योगांवर परिणाम: सोन्याचा दर वाढल्यामुळे ज्वेलर्सना व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी नवीन उपाय योजावे लागले.
आगामी काळातील संभाव्य ट्रेंड
विश्लेषकांच्या मते, जागतिक अनिश्चितता आणि भारतातील सोन्याच्या मागणीमुळे सोन्याचा दर पुढेही वाढतच राहील. तथापि, डॉलरची स्थिरता आणि आर्थिक सुधारणांमुळे या दरात थोडीशी घसरण देखील होऊ शकते.
2019 ते 2024 या काळात सोन्याच्या दराने (Gold Price) नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोन अजूनही महत्त्वाच मानल जात आहे. तंत्रज्ञान, जागतिक घडामोडी, आणि स्थानिक घटकांच्या प्रभावामुळे येणाऱ्या वर्षांत सोन्याचा दर कसा राहील, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.