Kanyadan Yojana Maharashtra : मुलीचा लग्नसोहळा अविस्मरणीय करणं हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असत. पण सध्याच्या वाढत्या महागाईमूळ प्रत्येकाला ते शक्य होत नाही. यासाठीच ‘कन्यादान योजना’ (Kanyadan Yojana) मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत करते. कन्यादान योजना नेमकी काय आहे? या योजनेचा लाभ कुणाला मिळतो? यासाठी पात्रता काय आहे? त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
कन्यादान योजना ही राज्य सरकारद्वारे राबवली जाणारी एक योजना आहे. जी मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देते. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या पालकांना मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मत दिली जाते.
महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय कुटुंबातील मुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केलेली आहे.
कन्यादान योजनेसाठी पात्रता काय आहे?
- – वधू व वर महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
- – वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- – वधू-वर यांच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान लागू असेल.
- – नवदाम्पत्यातील वधू/वर हे दोन्ही किंवा एक हे अनुसूचित जाती (नवबौद्धासह) असावा, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- – जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले असावे.
- – आंतरजातीय विवाहास 30 जानेवारी 1999 च्या शासन निर्णयानुसार जे फायदे मिळतात तेही फायदे अनुज्ञेय राहतील.
- – बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पत्य किंवा कुटूंब यांच्याकडून झालेला नसावा. त्यासाठीचे लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
कन्यादान योजनेद्वारे मदत कशी मिळते ?
कन्यादान योजनेद्वारे नव विवाहित दाम्पत्यास सरकारकडून 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत वधूच्या पालकांच्या नावे मंजूर केली जाते. पण त्यासाठी आर्थकदृष्ट्या कमकुवत असल्याकारणाने सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणे बंधनकारक आहे. अशा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्था किंवा संघटनांना सरकारकडून प्रत्येक जोडप्यामागे 4000 रुपये दिले जातात.