Majhi Ladki Bahin Yojana Update: ‘मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिन’ योजना महिलांसाठी महत्त्वाची ठरली असून, या योजनेतील लाभाची रक्कम 1500 रुपये वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, आता महिलांना हा वाढीव लाभ कधी मिळणार, याची उत्सुकता आहे. (Discover updates on the Ladki Bahin Yojana. BJP assures ₹2100 benefits to women. Learn when the increased amount will be credited to beneficiaries’ accounts).
आतापर्यंत मिळालेले लाभ
‘लाडकी बहिन योजने’अंतर्गत आत्ता पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जुलै 2024 पासून ऑक्टोबर 2024 पर्यंत 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत. या रकमेचा लाभ 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना दिवाळीपूर्वी मिळाला.
माझी लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळतील?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बाहीन योजनेच्या 1500 रुपयांच्या हत्याची रक्कम वाढवू 2100 रुपये करण्याची घोषणा निश्चितच अमलात आणली जाईल. त्यांनी सांगितले की, “आम्ही जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पाळणार आहोत आणि नवीन वाढीव रक्कम बहुधा 7 ते 8 महिन्यात लागू होऊ शकते.”
🔴 हेही वाचा 👉 2025 पासून महिलांसाठी सुरू होतेय नवीन योजना, पण फक्त ‘याच’ महिलांना मिळणार लाभ New Sarkari Yojana 2025.
वाढीव रकमेची तयारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंबंधी पत्र लिहून पुढील तारखा निश्चित करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून असे दिसून येत आहे की हा निर्णय सध्यातरी अंमलात येणार नसून माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्यात 1500 रुपयांचा हफ्ता जमा केला जाईल.
🔴 लेटेस्ट अपडेट वाचा 👉 या महिलांचे अर्ज बाद, सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा.
पात्र महिलांना नवा लाभ
आता लवकरच सरकार स्थापन होणार असल्याने महिलांना 6व्या हफ्त्याचा लाभ दिला जाईल. पण 2100 रुपये कधीपासून मिळणार, यावर सध्यातरी निर्णय होणार नाही. त्यामुळेच या योजनेचा पुढील टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना आता नेमके कधी मिळतील 2100₹?.