मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारने तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची प्राथमिक तपासणी सुरू केली असून निकषांमध्ये अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. (Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries under scrutiny! Government starts verification of applications; ineligible applicants to lose ₹1500 monthly benefits).
सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. लवकरच ही रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. मात्र, अर्ज करताना ज्या लाभार्थ्यांनी योजनेचे नियम आणि निकष पाळले नाहीत, त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत.
🔴 हेही वाचा 👉 आधार अपडेट करण्यासाठी उरले फक्त 4 दिवस, मोफत अपडेट प्रक्रिया येथे जाणून घ्या.
सध्या तपासणी प्रक्रिया कशी सुरू आहे:
- ज्या अर्जांविरोधात तक्रारी आल्या आहेत, त्यांची प्राथमिक तपासणी केली जात आहे.
- अर्जांच्या तपासणीत कुटुंबाची आर्थिक स्थिती, वय आणि अन्य निकष तपासले जात आहेत.
- पात्र महिलांचे अर्ज कायम ठेवले जात असून अपात्र अर्ज बाद केले जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या छाननी प्रक्रियेबाबत आधीच संकेत दिले होते. “आमच्याकडे योजनेबाबत अनेक महिलांविरोधात तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे अर्जांची तपासणी सुरू केली आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू असून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा वाढीव लाभ दिला जाईल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, लाडक्या बहिणींना दिलासा.
2 कोटी 34 लाख महिला लाभार्थी
सध्या 2 कोटी 34 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी आहेत. प्राथमिक तपासणीत तक्रार प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरु झाली असल्याने यातील एकूण किती महिलांचे अर्ज बाद होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🔴 हेही वाचा 👉 मोठी बातमी! अर्जांच्या छाननीत ५० लाख लाभार्थी अपात्र होण्याची शक्यता.