Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Rejected Applications Pimpri Chinchwad: राज्य सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पिंपरी-चिंचवड मधून एकूण ४.३२ लाख अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, यापैकी ४२,४८६ अर्ज बाद झाले आले आहेत, यामागे विविध कारणे आहेत.
अर्ज बाद होण्यामागची कारणे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. परंतु, पुढील कारणांमुळे अनेक महिलांचे अर्ज बाद झाले आहेत:
- आवश्यक कागदपत्रांची कमतरता
- महिला/महिलेचा पती पेन्शन घेत असणे
- उत्पन्न मर्यादा ओलांडणारे अर्जदार
- एका कुटुंबातून 2 पेक्षा जास्त अर्ज दाखल होणे
- अन्य योजनेचा लाभ घेतला असणे
लाभ वितरणात विलंब
ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांपैकी अनेक महिलांना योजनेचा फायदा मिळाला आहे. मात्र, काही महिलांना अजूनही ₹१,५०० च्या हफ्त्याची वाट पाहावी लागत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ मध्ये अर्ज मंजूर होऊनही अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. विधानसभेच्या निवडणुकांनंतर लाभ वितरणात अडथळा आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महिलांचा प्रतिसाद आणि शंका
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिलांना कठीण काळात आर्थिक आधार मिळाल्याचे समाधान आहे. परंतु, मोठ्या संख्येने अर्ज बाद झाल्याने आणि लाभ वितरणात झालेल्या विलंबामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
अर्ज मंजूर पण जमा झाले नाहीत पैसे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर होऊनही अजूनही ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात लवकरच योजनेचे पैसे जमा केले जातील. मात्र, प्रलंबित लाभ नेमका कधी वितरित केला जाईल, याबाबत अधिकृत घोषनेची प्रतीक्षा आहे.