PPF, सुकन्या समृद्धी सारख्या लहान बचत योजनांमध्ये खाते असलेल्यांसाठी महत्वाची बातमी New Rules for Small Savings

4 Min Read
New Rules For Small Savings 2024

New Rules for Small Savings | लहान-बचतींसाठी नवीन नियम: आता, आजी-आजोबा कायदेशीर पालक असल्याशिवाय त्यांना सुकन्या समृद्धी खाते उघडता येणार नाही. तसेच एकापेक्षा अधिक PPF खाती असल्यास ती एकत्र करणे आवश्यक आहे.

New Rules for Small Savings: केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSAS) आणि बंद राष्ट्रीय बचत योजना (NSS-87) सारख्या लहान बचत योजनांशी संबंधित गुंतवणूकदारांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. जर तुम्ही यातील एखाद्या योजनेअंतर्गत एका पेक्षा जास्त खाती उघडली असतील, तर तुम्हाला तुमची खाती एकत्र करावी लागतील. बदललेले नवीन नियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहेत. या नवीन नियमांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात… 

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

1: फक्त एकच PPF खाते ठेवता येणार

12 जुलै रोजी वित्त मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार, आता गुंतवणूकदार पीपीएफ अंतर्गत फक्त एक खाते ठेवू शकतात. एखाद्या गुंतवणूकदाराकडे दोन पीपीएफ खाती असल्याचे आढळल्यास, त्याला एक खाते प्राथमिक खाते म्हणून घोषित करावे लागेल आणि दुसऱ्या खात्यात जमा केलेली रक्कम प्राथमिक खात्यात हस्तांतरित केली जाईल. यानंतर दुसऱ्या खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेवर शून्य टक्के व्याज दिले जाईल. आणी त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीकडे दोनपेक्षा जास्त पीपीएफ खाती असल्याचे आढळून आले तर, त्या खात्यांवर आतापर्यंत मिळालेले सर्व व्याज परत घेतले जाईल.

2: अल्पवयीन व्यक्तीसाठीही पीपीएफ खाते

वैयक्तिक खात्याव्यतिरिक्त, तुम्ही अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने पीपीएफ खाते देखील उघडू शकता. येथे देखील एका वर्षात किमान ₹ 500 आणि जास्तीत जास्त ₹ 1.5 लाख गुंतवावे लागतील. अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त खाती उघडल्यास त्यापैकी एक मुख्य खाते म्हणून घोषित केले जाईल आणि इतर खाती ‘अनियमित खाती’ समजली जातील. सध्याचा पोस्ट ऑफिस बचत खाते व्याज दर (4% प्रतिवर्ष) अनियमित खात्याला लागू होईल, तर मुख्य खात्यावर सामान्य दराने (7.1%) व्याज मीळेल.

3: अनिवासी भारतीय (NRI) पीपीएफ खाते उघडू शकणार नाहीत 

अनिवासी भारतीयांना (NRI) पीपीएफ खाते ठेवणे आता शक्य होणार नाही. ज्या अनिवासी भारतीयांनी त्यांच्या निवासी स्थितीची पडताळणी न करता PPF खात्यात गुंतवणूक करणे सुरू ठेवले आहे त्यांना त्यांच्या खात्यांवर 12 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दरांप्रमाणे व्याज मिळेल, त्यानंतर त्यांच्या खात्यावर शून्य व्याज लागू होईल. अनिवासी भारतीय नवीन पीपीएफ खाती उघडू शकत नाहीत, पण जर त्यांनी निवासस्थान बदलण्यापूर्वी खाते उघडले असेल, तर ते परिपक्व होईपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकतात, पण त्यांना आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.

4: आजी आजोबा सुकन्या समृद्धी खाते उघडू शकणार नाहीत

सुकन्या समृद्धी योजनेसाठी (SSAS) फक्त मुलीचे पालकच खाते उघडू शकतात, असे सरकारने स्पष्ट केले आहे. आजी आजोबांनी उघडलेली SSAS खाती आता पालक किंवा कायदेशीर पालकाच्या नावावर हस्तांतरित केली जातील. ही योजना 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी आहे आणि हे खाते 18 वर्षे वयापर्यंत सुरु राहते. ही योजना सध्या 8.2% वार्षिक व्याज देते.

5: राष्ट्रीय बचत योजना (NSS) (बंद झालेली)

राष्ट्रीय बचत योजना (NSS) 1992 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि 2002 मध्ये बंद करण्यात आली.  या योजनेत 7.5% व्याज दिले जात होते, जे पूर्वी 11% होते. पाहिली खाती 12 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत सुरु राहतील, पण त्यानंतरच्या खात्यांवर पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दराने 6% व्याजदराने व्याज दिले जाईल.  1 ऑक्टोबरनंतर हे खाते शून्य व्याजाने चालेल, म्हणजेच ही योजना बंद समजली जाऊ शकते.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article