2025 पासून महिलांसाठी सुरू होतेय नवीन योजना, पण फक्त ‘याच’ महिलांना मिळणार लाभ New Sarkari Yojana 2025

2 Min Read
New Government Scheme 2025 Maharashtra

New Sarkari Yojana 2025 Maharashtra: महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी आणखी एक महत्वपूर्ण योजना सुरु करण्यात येत असून या योजनेचा लाभ राज्यातील घरकाम करणाऱ्या मोलकरणींना होणार आहे. (Maharashtra Government to launch a new scheme for domestic workers (molkarin) in February 2025. Eligible women will receive a household kit worth ₹10,000. Learn about eligibility and benefits).

New Government Scheme 2025: मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) घरकाम करणाऱ्या महिलांसाठी फेब्रुवारी 2025 पासून एक नवीन गृहोपयोगी साहित्य वाटप योजना सुरू करणार आहे. यामध्ये स्वयंपाकासाठी आवश्यक कुकरसह 21 प्रकारची भांडी देण्यात येणार आहेत. या साहित्याची एकूण किंमत अंदाजे 10,000 रुपये असेल. 

🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठे बदल, लवकरच अंमलबजावणी.

योजनेसाठी पात्रता आणि लाभ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही योजना फक्त नोंदणीकृत घरगुती कामगार-मोलकरणींसाठी लागू असेल. राज्यातील 10 ते 12 लाख घरगुती कामगार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. 

🔴 हेही वाचा 👉 PMVY 2025: योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जाही.

योजनेचा हेतू आणि प्रेरणा

घरगुती कामगार-मोलकरणींसाठी सुरु करण्यात येत असलेली ही योजना महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी लागू असलेल्या साहित्य वाटप योजनेच्या धर्तीवर आखली गेली आहे. महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि त्यांचे जीवन सुसह्य करणे, हा सरकारचा उद्देश आहे.  

लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हफ्त्यासोबतच या नवीन योजनेबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये या योजनेसाठीच्या अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाहीर केली जाईल.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना 2100 देणार की नाही? भाजपने दिले स्पष्ट संकेत!.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now