PM Awas Yojana Rural : प्रधानंत्री आवास योजना ग्रामीणच्या नियमांमध्ये काही महत्वपपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी, शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PM Awas Yojana Rural) योजनेत मोठे बदल करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांकडे दुचाकी, मोटार आधारित मासेमारीच्या बोटी, लँडलाईन फोन, फ्रीज होते त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. सरकारकडून आता या अटी शिथील करण्यात आल्या आहेत. तसेच लाभार्थी कुटुंबाची मासिक उत्पन्नाची अट देखील 10 हजार रुपयांवरून 15 हजार रुपये करण्यात आली आहे.
पीएम आवास योजना ग्रामीण मध्ये झालेले बदल
पीएम आवास योजना (ग्रामीण) मधील महत्त्वाच्या अटी शिथील करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे दुचाकी, मोटार नियंत्रित मासेमारीची बोट, फ्रीज आणी लँडलाईन फोन असेल त्यांना देखील आता पीएम आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल ते देखील आता पीएम आवास योजनेसाठी अर्ज करू शकतील.
या अटींमध्ये बदल नाही
ज्या कुटुंबाकडे तीन चाकी आणि चार चाकी वाहन आहे, किंवा शेतीसाठी लागणारे तीन चाकी आणि चार चाकी वाहन किंवा यंत्र असेल आणि त्यांच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 50 हजार असेल, सरकारी कर्मचारी, नोंदणीकृत अकृषिक क्षेत्रातील उद्योजक, प्राप्तिकर भरणारे व्यक्ती, व्यवसाय कर भरणारे व्यक्ती आणि अडीच एकरांपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्तींना पीएम आवास योजना ग्रामीणचा लाभ घेता येणार नाही.
या योजनेअंतर्गत, ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी सरकारकडून 1 लाख 20 हजार रुपयांची मदत, आणी डोंगरी भागातील नागरिकांना 1 लाख 30 हजार रुपयांची मदत केली जाते.