Pradhan Mantri Matritva Vandana Yojana: सरकारने गर्भवती महिलांसाठी एक विशेष योजना पंतप्रधान मातृत्व वंदना योजन सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना बाळाच्या जन्मानंतर 6000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. हे पैसे महिलेच्या बँक खात्यात जमा केले जातात. सरकारची ही योजना महिलांच्या पोषणासाठी आणि कुपोषण कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. चला तर मग, जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती. (Pradhan Mantri Matritva Vandana Yojana offers 6000 rupees for pregnant women post-childbirth. Read how to apply and eligibility for this government initiative supporting maternal health and nutrition).
🔴 हेही वाचा 👉 सरकारने जाहीर केले 2100 रुपये, पण लाडक्या बहिणींना जावे लागणार या पडताळणी प्रक्रियेतून.
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana | पंतप्रधान मातृत्व वंदना योजना:
- सुरुवात: 1 जानेवारी 2017
- उद्देश: गर्भवती महिलांना पोषण व आजारपणासाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत प्रदान करणे.
- पात्रता: गर्भवती महिला ज्यांचे वय 19 वर्षांपेक्षा जास्त आहे.
या योजनेअंतर्गत पैसे कसे मिळतात?
- पहिला टप्पा: 1000 रुपये
- दुसरा टप्पा: 2000 रुपये
- तिसरा टप्पा: 2000 रुपये
शेवटच्या टप्प्यात बाळाच्या जन्मानंतर 1000 रुपये खात्यात जमा होतात.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- अर्ज: येथून https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या योजनेचा फॉर्म डाउनलोड करा.
- संपर्क: तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास 7998799804 या हेल्पलाइनवर संपर्क करा.
अर्ज करणाऱ्यांसाठी अटी:
- दुसरे अपत्य झाल्यानंतर 270 दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.
- महिला लाभार्थ्यांचे वय 18 ते 55 वयोगटात असावे.
- आधार कार्ड अनिवार्य.