Majhi Ladki Bahin Yojana News Today : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिल्या आणी दुसऱ्या टप्प्यातील निधी वाटपाबाबतची ताजी आकडेवारी समोर आली आहे. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात झालेल्या निधी वाटपाचा राज्यातील एकूण किती महिलांना लाभ मिळाला ते जाणून घ्या… (Crores women benefited in the first two phases. The deadline to apply has been extended to 30th September 2024. Check the latest updates now)
Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. आणी लगेच ही योजना आमलात आणली गेली. जुलै 2024 पासून राज्यात ही योजना लागू झाली. आणी राज्यातील महिलांनीही या योजनेला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिलांचा मिळणारा प्रतिसाद पाहता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत होती. पण राज्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून ती 30 सप्टेंबर 2024 करण्यात आली आहे.
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात एकूण किती महिलांना मिळाले पैसे?
नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सुमारे 1 कोटी 59 लाख महिलांना लाभ मिळाला. राज्य सरकारकडून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याने लाभार्थी महिलांची संख्या लवकरच 2 कोटीच्या घरात जाईल.
अजूनही अर्ज केला नसल्यास मुदतीच्या आत अर्ज करण्याचे आवाहन
ज्या भगिनींनी काही कारणास्तव अद्याप लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.