Atal Bandhkam Kamgar Yojana News | Devendra Fadnavis : बांधकाम कामगार मंडळ बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असते. यतीलच एक योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते आता त्यात वाढ करण्यात आली असून. बांधकाम कामगारांना अजूनही काही सुविधा देण्यात येणार आहेत. त्याबद्दल सविस्तर जाऊन घ्या. (Under the Atal Bandhkam Kamgar Yojana, construction workers will now receive Rs 1 lakh assistance for purchasing land. Learn about the latest benefits announced by Devendra Fadnavis)…
अटल बांधकाम कामगार आवास योजनेतंर्गत राहायला स्वतःची जागा नसलेल्या बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते. आता या रकमेमध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य 1 लाख रूपये करण्याचा निर्णय नुकताचं घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजनांची अर्ज स्वीकृती करून घेण्यात येणार आहे. तसेच बांधकाम कामगाराबाबत 90 दिवसांचे प्रमाणपत्रही बांधकाम कामगारांना देण्यात येईल व कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कामगारांच्या गरजेप्रमाणे आवश्यक असणाऱ्या नवीन वस्तूंचा समावेश केला जाणार आहे.
(Atal Bandhkam Kamgar Yojana News).