Soiled Taped Torn Note Exchange Rbi Guidelines : (RBI) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फाटलेल्या नोटांबाबत काही नियम केले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार- खराब झालेल्या, चिकटवलेल्या, फाटलेल्या नोटा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत बदलून घेता येतात. पण तुम्ही जर एखादी नोट बदलून घेत असाल तर तुम्हाला त्या नोटच्या बदल्यात तितकेच पैसे मिळतील हे तुमच्या नोटच्या स्थितीवर अवलंबून असते. काही वेळेस तुमच्या जुन्या नोटच्या मोबदल्यात तुम्हाला बँकेकडून कमी पैसे मिळू शकतात.
Damaged Notes Exchange Rbi Guidelines: रिझर्व्ह बँकेने अशा खराब झालेल्या, फाटलेल्या नोटा बदलून देण्याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार खराब झालेल्या, चलनास योग्य नसलेल्या नोटा बदलून दिल्या जातात. नंतर त्या खराब नोटा चलनातून काढून त्यांच्या जागी नवीन नोटा बाजारात आणल्या जातात.
तुमच्याकडे असणारी कोणतीही खराब, फाटलेली नोट तुम्ही बँक किंवा आरबीआयच्या शाखेतून बदलून घेऊ शकता. पण, त्याबदल्यात मिळणारे पॆसे हे तुमची नोट किती फाटली आहे यावर अवलंबून असते.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, एका वेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलल्या जाऊ शकतात. त्यांचे मूल्य रु 5000 पेक्षा जास्त नसावे. रु 5000 पर्यंतचे पैसे बँक काउंटरवर ताबडतोब रोख स्वरूपात मिळतील. पण जर यापेसखा जास्त मूल्याच्या नोटा बदलून घेतल्यास त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील. त्याचबरोबर 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा बदलून देण्यासाठी बँकेला थोडा वेळ लागू शकतो.
बँक तुमच्याकडून सर्व प्रकारच्या फाटलेल्या किंवा खराब नोटा परत घेऊ शकते, परंतु जर एखादी नोट पूर्णपणे खराब झाली असेल किंवा जास्त जळाली असेल तर बँक अशा नोटा परत घेणार नाही.
सामान्य बँका जळलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत आरबीआय शाखेतून जळलेल्या नोटा बदलून दिल्या जातात. पण जळलेल्या नोटांचे मूल्य नोटच्या स्थितीवर अवलंबून असते. त्या मोबदल्यात तुम्हाला कमी पैसे मिळू शकतात.
आरबीआय च्या नियमानुसार, कोणतीही बँक तुमची फाटलेली नोट बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही.