घरात एकापेक्षा जास्त व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास त्यांना मिळणार का 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार Ayushman Bharat Yojana

1 Min Read
Ayushman Bharat Yojana Senior Citizens Free Treatment

Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे. सध्या लोकसंख्येच्या ४० टक्के लोकांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळत आहे. पण केंद्र सरकारच्या नवीन निर्णयामुळे साडेचार कोटी कुटुंबातील जवळपास ६ कोटी अतिरिक्त लाभार्थी या योजनेत सामील होणार आहेत.

प्रत्येक कुटुंबातील ७० वर्षांवरील व्यक्तींना आता आयुष्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत उपचारासाठी सरकारकडून दरवर्षी ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे.

घरातील एकापेक्षा जास्त वृद्ध व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, आयुष्मान योजनेंतर्गत मिळणारे ५ लाख रुपये समान भागांमध्ये विभागले जातील. म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला वर्षाला फक्त ५ लाख रुपये मिळतील.

सेवानिवृत्त कर्मचारी किंवा सीजीएचएस अंतर्गत उपचारासाठी मदत घेणारे लोक आयुष्मान योजनेचा लाभ घेऊ शकतील. पण त्यांना सरकारकडून अगोदर मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच लाभार्थ्याला दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा अधिकार असेल.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now