Ladki Bahin Yojana December January Installment Date Maharashtra : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत महायुती सरकारने महाराष्ट्रात सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यभर महिलांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकांमुळे डिसेंबर महिन्याचा सहावा हफ्ता महिलांना मिळू शकला नाही. (Will Ladki Bahin Yojana beneficiaries receive December and January payments together? Beneficiaries are expected to get ₹3000 before Makar Sankranti. Read the latest updates on the scheme and upcoming government decisions).
डिसेंबर-जानेवारीचे ३००० रुपये मिळणार
Majhi Ladki Bahin Yojana December January Payment Update: महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे ३००० रुपये एकत्रितपणे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मकरसंक्रांतीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यावर येईल, अशी माहिती आहे. तथापि, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही.
पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
महायुतीचे नवे सरकार आज शपथ घेत आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसंदर्भात अंतिम निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महिलांना महिन्याला ₹१५०० देण्यात येणाऱ्या या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठी मदत मिळाली. तसेच, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना दरमहा ₹२१०० देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. त्यामुळे या निर्णयाकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
🔴 हेही वाचा 👉 PM Free Recharge Yojana: तीन महिन्यांचा मोफत रिचार्ज? जाणून घ्या नेमकी काय आहे ही योजना,.
“योजनेच्या ताज्या अपडेटसाठी marathisarkariyojana.in वेबसाइटला भेट द्या किंवा गूगलवर व्हॉइस सर्च करा – ‘मराठी सरकारी योजना‘ आणि मिळवा महाराष्ट्र सरकारच्या योजनांची सर्व माहिती, एका आवाजात!”