Treatment Covered Under Ayushman Bharat Scheme : आयुष्मान भारत योजनेशी संबंधित एक मोठी बातमी आहे. बुधवारी मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता देशातील ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या जेष्ठ व्यक्तींना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांच्या आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा देशातील 6 कोटींहून अधिक लोकांना फायदा होणार आहे.
प्रत्येक कुटुंबातील ७० वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारने यापूर्वीच एप्रिल महिन्यात आयुष्मान भारत योजनेत हा बदल करण्याचे संकेत दिले होते. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोणत्या आजारांवर उपचार केले जाऊ शकतात त्याबद्दल जाणून घ्या…
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तुम्ही अनेक मोठ्या आजारांवर उपचार घेऊ शकता. तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असेल तर तुम्ही कॅन्सरसारख्या धोकादायक आजारावरही उपचार घेऊ शकता. तसेच या योजनेंतर्गत हृदय आणि किडनीशी संबंधित गंभीर आजारांवरही उपचार केले जातात. याशिवाय आयुष्मान भारत योजनेंतर्गत कोरोना आणि मोतीबिंदूचे उपचारही करता येतात.
Ayushman Bharat Yojana Treatment List | आयुष्मान भारत योजना उपचार यादी
उपचार |
---|
कर्करोग |
मूत्रपिंड रोग |
हृदयरोग |
यकृत रोग |
श्वसन रोग |
न्यूरोलॉजिकल विकार |
मानसिक आजार |
जळलेल्या जखमा |
नवजात रोग |
जन्मजात विकार |
संसर्गजन्य रोग (जसे की क्षय आणि मलेरिया) |
जर तुमच्याकडे आयुष्मान भारत कार्ड असेल तर तुम्ही 29 हजारांहून अधिक नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला तुमचे आयुष्मान भारत कार्ड बनवायचे असेल तर ते बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.
तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राला भेट देऊन आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करू शकता. तसेच, तुम्ही आयुष्मान भारत योजनेच्या पोर्टल किंवा आयुष्मान मित्र ॲपच्या मदतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता. आणी तुमचे आयुष्मान कार्ड (Ayushman Card) बनवून घेऊ शकता.