मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केली लाडकी बहीण योजनेबद्दलची भूमिका CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana Update

1 Min Read
CM Devendra Fadnavis Press Conference Today Majhi Ladki Bahin Yojana Update

CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी लाडकी बहीण योजना शेतकरी कर्जमाफी, आणि मराठा आरक्षणासह विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. (CM Devendra Fadnavis Press Conference: Key highlights include farmer loan waiver, Ladki Bahin Yojana, and Maratha reservation updates. Learn more about his government’s priorities and initiatives).

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून लाभार्थ्यांना २१०० रुपये देण्यासाठी लवकरच आवश्यक तरतूद केली जाईल. शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा, पायाभूत सुविधा आणि नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार आहे.  

आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, जातीय जनगणनेमुळे लहान जातींवर अन्याय होऊ शकतो. शक्ती कायद्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या पहिल्याच पत्रकार परिषदेने लाडक्या बहिणींमध्ये आणी महाराष्ट्राच्या जनतेत अपेक्षांचे नवे वारे निर्माण केले आहेत. 

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now