DA Hike News Central Government Today : जुलै 2024 पासून महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची प्रतीक्षा करत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सप्टेंबरअखेर सरकारकडून घोषणा अपेक्षित आहे. जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या या डीए वाढीच्या नेमक्या तारखेचा निश्चित अंदाज मिळाला असून, कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
डीए ३% ने वाढेल
जानेवारी ते जून 2024 पर्यंतच्या AICPI-IW इंडेक्स डेटाच्या आधारे, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% ने वाढेल असा निर्णय घेण्यात आला आहे. जूनसाठी AICPI निर्देशांक 141.4 अंकांवर पोहोचल्यानंतर, DA चा स्कोअर 53.36% पर्यंत वाढला आहे, जो पूर्वी 50.84% होता. यावरून केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ टक्के वाढ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सप्टेंबरअखेर पर्यंत घोषणा
महागाई भत्तावाढी संदर्भात घोषणा सप्टेंबरच्या अखेरीस होणार असली तरी ती लागू जुलै 2024 पासून होईल. जुलै ते सप्टेंबरपर्यंतची थकबाकी दिली जाईल, ज्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांचा थकबाकी डीए मिळेल.
7 व्या वेतन आयोगाअंतर्गत
आतापर्यंत 7व्या वेतन आयोगाअंतर्गत 50% DA आणि DR दिला जात होता आता तो वाढून 53% होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. यानंतर ऑक्टोबरच्या पगारात डीए वाढीबरोबरच थकबाकीही दिली जाईल.
आधार वर्ष (Base year) बदलण्याबाबत शिफारस?
सध्या डीए मोजण्यासाठी आधारभूत वर्ष बदलण्याची गरज नाही किंवा अशी कोणतीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे भविष्यातही महागाई भत्ता ५० टक्क्यांच्या वर राहील आणि कर्मचाऱ्यांना या वाढीचा थेट लाभ मिळेल.