Gold Price Forecast India: जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर भविष्यात तुम्हाला त्यातून किती परतावा मिळू शकतो हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. 2025 मध्ये भारतात सोन्याच्या किमती किती रुपयांपर्यंत वाढतील? त्याबाबत काय अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या…
Expected Gold Price in 2025 in India: सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर भविष्यात तुम्हाला त्यातून किती परतावा मिळू शकतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. परताव्याच्या बाबतीत सोने इतर सर्व गुंतवणूकिंपेक्षा नेहमीच चांगले असल्याचे समजले जाते. शेअर बाजार किंवा मालमत्तेच्या किमती घसरल्या तरी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल होत नाही. यामुळेच अनेक वर्षांपासून सोने हा गुंतवणुकीसाठी अनेकांचा आवडता पर्याय आहे. सध्या सोन्याचा भाव 72,700 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की सोन्याचा भाव लवकरच 75,000 ते 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. त्यातच आता सोन्याच्या किमतीबाबत आणखी एक मोठा अंदाज समोर आला आहे.
बँक ऑफ अमेरिकेचा सोन्याच्या किंमतीबाबतचा अंदाज
बँक ऑफ अमेरिकाच्या (Bank of America) धोरणकर्त्यांनी 2025 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3,000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. बँक ऑफ अमेरिकाच्या अंदाजानुसार सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे. सोन्याची किंमत प्रति औंस $3,000 वर गेली तर ‘भारतात 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 90,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते’.
गोल्डमन सॅक्सचा अंदाज
गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs) ही जगातील सर्वांत मोठी आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे. गोल्डमन सॅक्सची स्थापना १८६९ मध्ये झाली होती. याचे मुख्यालय अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात आहे. बँक ऑफ अमेरिका व्यतिरिक्त गोल्डमन सॅक्सचाही सोन्यात तेजी येण्याचा अंदाज आहे. गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे की 2025 च्या सुरुवातीस सोन्याच्या किमती $2,700 प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात, तस झाल्यास भारतात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम रु 81,000 ईतकी होईल.
🔴 हे वाचलं का 👉 भारतात कायदेशीररित्या तुम्ही किती सोने घरात ठेवू शकता, आयकर विभागाने जारी केले नियम Gold At Home Rule.