Mazi Ladki Bahin Yojana December 2024 Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिला डिसेंबरच्या 6 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. निवडणूक आचारसंहिता संपताच 6वा हफ्ता दिला जाईल अस सांगितल जात होत, पण मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेल्या पेचामुळे 6व्या हफ्त्यास विलंब होत असल्याच बोललं जात आहे. (Majhi Ladki Bahin Yojana December Installment: Women beneficiaries are eagerly awaiting the next installment. Check when the December payment will be credited).
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जारी केला जाऊ शकतो. 5 डिसेंबरला मुंबईत मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी माहिती समोर आली आहे.
5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना होईल आणी त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता जारी केला जाईल. त्यानंतर होणाऱ्या बैठकीत हफ्त्याची रक्कम वाढवण्याबाबत चर्चा होईल. या 6व्या हफ्त्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपयेच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🔥 हेही वाचा 👉 2025 पासून महिलांसाठी सुरू होतेय नवीन योजना, पण फक्त ‘याच’ महिलांना मिळणार लाभ.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. नवीन सरकार 5 डिसेंबर 2024 रोजी शपथ घेणार आहे आणि त्यानंतर 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची बातमी.