मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा! महिलांना २१०० रुपयांचा हप्ता देण्यासाठी… Majhi Ladki Bahin Yojana 2100 Confirmation CM Devendra Fadnavis

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 2100 Confirmation CM Devendra Fadnavis

Majhi Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. (Mukhyamantri Majhi Ladki Behna Yojana Maharashtra Update: CM Devendra Fadnavis announces plans to release the next installment of ₹2100 during the upcoming budget. Learn more about beneficiary criteria and government initiatives).

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. फडणवीस यांनी ही योजना सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यांनी सांगितले की, महिलांना २१०० रुपयांचा हप्ता देण्यासाठी आवश्यक तरतूद बजेटमध्ये केली जाईल. ईथुन पुढची 5 वर्षे महिलांना दरमहा २१०० रुपये मिळत राहतील आणी त्याचबरोबर योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची योग्य तपासणी केली जाईल. आणी फक्त गरजू लाभार्थीनाच या योजनेचा लाभ मिळेल.

देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ज्या महिला लाभार्थी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील त्यांचा या योजनेचा लाभ कायम राहील. परंतु, काही तक्रारींनुसार, जे मापदंडांमध्ये बसत नाहीत, त्यांच्यावर पुनर्विचार केला जाईल. योजनेच्या प्रामाणिकतेसाठी सरकार कठोर पावले उचलेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला असून, यामुळे महायुतीने २३५ जागांवर विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे राज्यातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now